सह्याद्री व्हॅलीत ITI विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू

1 min read

राजुरी दि.३:- राजुरी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली शैक्षणिक संकुलातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आय.टी.आय.) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती प्राचार्य पी. बलराम यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना. प्राचार्य पी. बलराम यांनी सांगितले की सह्याद्री व्हॅली शैक्षणिक संकुलातील सह्याद्री व्हॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे चार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत कार्यशाळा, सुसज्ज यंत्रसामग्री उपलब्ध आहेत.अत्याधुनिक प्रयोगशाळेतील साहित्य विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी तयार केलेले आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स आणि वेल्डर हे चार अभ्यासक्रम चालवली जातात. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नोकरीसाठी प्रशिक्षण संस्थेचे पूर्ण सहकार्य विद्यार्थ्यांना असते.या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध आहे शासनाच्या नियमानुसार आय.टी.आय.ची प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार असून अधिक माहितीसाठी सह्याद्री व्हॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची संपर्क करावा असे आव्हान खजिनदार सचिन चव्हाण यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे