मुलाकडून आईवर कोयत्याने वार; गुन्हा दाखल

1 min read

अहिल्यानगर दि.३:- कौटुंबिक वादातून मुलाने आईवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना जखणगाव (ता. अहिल्यानगर) येथे घडली आहे. जनाबाई बाबासाहेब भिसे (वय ५६), असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत बाबासाहेब भिसे (रा. जखणगाव), असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. फिर्यादी या आपल्या घरासमोरील गोठ्यात दूध काढत असताना सूर्यकांत तेथे आला. त्याने माझी मुले व बायको कुठे आहेत, असे विचारले त्यावर फिर्यादी म्हटल्या की, तुला पुण्याला बोलावले आहे. याचा राग आल्याने मुलाने शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे