राजूर गावाला ७ कोटी ९६ लक्ष रू निधी; आमदार अतुल बेनके यांनी केले उद्घाटन
1 min read
राजूर दि.५:- जुन्नर तालुक्यातील राजू नंबर १ व राजूर नंबर ३ येथे विकासनिधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाला. रस्ते, शाळा, पाणी पुरवठा योजना अशा विविध कामांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी हातभार लागेल. आणि या कामांच्या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा ग्रामस्थांना मिळतील असा विश्वास याप्रसंगी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला. आदिवासी भागातील गावांच्या विकासासाठी तसेच राजूर गावच्या प्रगतीसाठी या पुढील काळातही कायम कटिबद्ध राहू असा विश्वास याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना आमदार बेनके दिला.
यावेळी खालील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.• राजूर नंबर १ बस स्टॉप ते स्मशाभूमी रस्ता करणे – २ कोटी• राजूर येथे जलजिवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा करणे – १.९८ कोटी
• राजुर नंबर २ रस्ता करणे – १.५ कोटी• राजूर नंबर १ भैरवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर रस्ता करणे – १ कोटी
• मुंढेवाडी येथे नवीन रस्ता करणे – १ कोटी• राजूर नंबर १ येथे स्मशानभूमी वेटिंग शेड करणे – १० लक्ष• राजुर नंबर १ येथील भैरवनाथ मंदिर सभा मंडप करणे – १० लक्ष• राजुर नंबर २ वाघबारस रस्ता करणे – १० लक्ष• राजुर नंबर २ हनुमान मंदिर सभा मंडप करणे – १० लक्ष• राजुर नंबर १ जिल्हा परिषद शाळा बांधणे – ८ लक्ष
यावेळी समवेत कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, ललित जोशी, अजिंक्य घोलप, गंगाराम सांगडे, सुखदेव रावते, सरपंच ज्योत्स्ना मुंढे, उपसरपंच शांताराम मुंढे, सदस्य सुनील मुंढे, सविता मुंढे, संगीता पठारे, विलास मुंढे, शशिकांत घायताडके, धोंडू मुंढे, लक्ष्मण महाराज मुरकुटे, वामन मुंढे, नाना मुंढे, सखाराम मांडवे, काळू मांडवे, संदीप मुंढे यांसह इतर मान्यवर आणि राजूर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.