ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळास लवकरच इनडोअर स्टेडियम साठी १ कोटी रुपयाचा निधी शासनाद्वारे उपलब्ध करून दिला जाईल:- आमदार अतुल बेनके

1 min read

आळे दि.५:- येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ-आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा क्रीडा विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी आमदार बेनके यांनी संवाद साधला. यावेळी कबड्डीचे सामने पाहताना खेळाडूंचा प्रेक्षणीय खेळ पाहण्याची संधी मिळाली या क्षणांचा आनंद आमदारांनी घेतला.

यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सर्व खेळाडूंना व संघांना आमदार बेनके यांनी आश्वासित केले. तसेच संस्थेस लवकरच इनडोअर स्टेडियम साठी एक कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाद्वारे उपलब्ध करून दिला जाईल. असे सर्व खेळाडू, कब्बडी प्रेमी आणि संघांना आश्वस्त केले. कबड्डी खेळाच्या प्रसारासाठी, उत्तम खेळाडू घडविण्यासाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून मी सातत्याने प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संग्राम राजाराम कुऱ्हाडे याची स्टेनो म्हणून सत्र न्यायालयात नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी समवेत संस्थेचे मानद सचिव अर्जुन पाडेकर, संचालक किशोर कुऱ्हाडे , संचालक देविदास पाडेकर, दिनेश सहाणे, संस्थेचे माजी संचालक शेखर कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ .प्रवीण जाधव, पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.रमेश गायकवाड, विभागीय सचिव डॉ. उमेशराज पनेरू इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय सचिव यांनी स्पर्धेचे प्रस्ताविक करून स्पर्धेविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव यांनी कबड्डीच्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे मानद सचिव अर्जुन पाडेकर यांनी संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना व संघांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार डॉ.रावसाहेब गरड यांनी माणले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.अरविंद कुटे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे