“संत श्री संताजी महाराज जगनाडे” आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंत्री मंडळ बैठकीत मंजुरी:- विलास वाव्हळ
1 min read
मुंबई दि.४:- बृहन महाराष्ट्र तेली समाज या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून संत श्री संताजी महाराज जगनाडे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी अध्यक्ष विलास वाव्हळ, सरचिटणीस दिलीप खोंड यांनी गेली दोन वर्ष पाठपुरावा केला होता. त्यासाठी नागपूर व मुंबई येथील अधिवेशना दरम्यान आंदोलन केले होते. सदरची मागणी मान्य व्हावी या करता प्रचंड आंदोलन बृहन महाराष्ट्र तेली समाज या संघटनेने केले होते. त्याला यश येऊन सदरचे महामंडळ स्थापन करण्याबाबत शुक्रवार दि.४ रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत ठराव पास करण्यात आला. त्या बद्दलचा लवकरच शासकीय परी पत्रक काढण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी दिली.