Joining hands व रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल कडून विद्यार्थांना ६ लाख ७५ हजार रुपये स्कॉलरशिप

1 min read

आळेफाटा दि.३:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल (ता.जुन्नर) चे मागील वर्षीचे माजी अध्यक्ष रो विजयकुमार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल आणि जॉइनिंग Hands दिल्ली यांच्या माध्यमातून करियर गायडन्स हा प्रोग्राम १००० विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला होता.

त्या कार्यक्रम अंतर्गत स्कॉलरशिप साठी काही गरजू मुलांनी फॉर्म भरले होते. त्यातील ३ मुलांना रती सपकाळ, अध्यक्ष रो विजयकुमार आहेर, अध्यक्ष रो हेमंत वाव्हळ आणि रो विमलेश गांधी यांच्या प्रयत्न मधून जवळपास 6,75000 इतकी मोठी रक्कम पुढील 4 वर्षात कॉलेज फी साठी मिळणार आहे.

नुकतेच आळॆ कॉलेज या ठिकाणी या मुलांचा आणि रती सपकाळ आणि माधुरी पाचपोर यांचा सन्मान करण्यात आला.रोटरी क्लब साठी खूप मोठी अभिमाना ची बाब असल्याचे माजी अध्यक्ष विजयकुमार आहेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक जीवन शिंदे आणि शाळेचे मुख्याध्यापक भवारी सर तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे