जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत मॉडर्नच्या विद्यार्थ्यांचा डंका; विभागीय स्पर्धेसाठी निवड
1 min read
बेल्हे दि.२:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने समर्थ गुरुकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथे पार पडल्या. यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १७ वर्ष मुले वयोगटातील ९ विद्यार्थ्यांनी योगासन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.
यामध्ये मुलांमध्ये जय रामदास भोईर व रोहन किरण भोईर या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक महेंद्र गुलवे, योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे,
उपप्राचार्य के.पी.सिंग व सर्व शिक्षक, पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेंद्र गुलवे व योगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.