समर्थ ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत डंका; पाच पदकांची कमाई
1 min read
बेल्हे दि.२६:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजतोरण कुस्ती संकुल, विंझर येथे पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. २३ ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये संपन्न झाल्या.
या स्पर्धांमध्ये १९ वर्षाखालील वयोगटात समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तसेच दोन विद्यार्थ्यांनी व एका विद्यार्थिनीने प्रत्येकी एक ब्राँझ पदक अशी पाच पदकांची कमाई केल्याची माहिती समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
निकालपत्र :- ९७ किलो वजनी गट मुले-वेदांत नानाभाऊ नवले-रौप्य पदक, ८७ किलो वजनी गट मुले-रोशन रोहिदास लामखडे-रौप्य पदक , ६७ किलो वजनी गट मुले-करण शंकर पानसरे-ब्राँझ पदक, ६३ किलो वजनी गट मुले-स्वप्निल भास्कर चासकर-ब्राँझ पदक, ६२ किलो वजनी गट-मुली- अलिशा शरिफ शेख-ब्राँझ पदक
या यशस्वी विद्यार्थ्यांना समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, सुरेश काकडे, प्रा.किर्ती थोरात, ज्ञानेश्वर जाधव, प्रा.संतोष पोटे, प्रा.राजेंद्र नवले, प्रा.विनोद चौधरी, प्रा.अमोल खामकर यांनी मार्गदर्शन केले.
समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये समर्थ क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत समर्थ कुस्ती केंद्राची स्थापना यावर्षी करण्यात आली असून शालेय खेळाडूंसाठी आधुनिक मॅट व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
या केंद्रात प्रशिक्षित झालेल्या खेळाडूंनी पहिल्याच वर्षात उत्तम कामगिरी केल्याचे समाधान आहे, असे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितली. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी अभिनंदन केले.