जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत ६७६ स्पर्धकांचा सहभाग
1 min readराजुरी दि.२२:- विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षैत्रात करीअर करून आपल्या शाळेचे व आई वडीलांचे नाव मोठे कसे होईल याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी राजुरी या ठिकाणी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शण करताना ते बोलत होते. या प्रसंगी उपसरपंच माऊली शेळके, उद्योजक पंकज कणसे, वल्लभ शेळके, ज्ञानेश्वर गटकळ, शाकीर राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, शाकीर चौगुले. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष संदीप औटी, गणेश हाडवळे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, उपाध्यक्ष संतोष गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तायडे म्हणाले की मोबाईलमुळे मुल ही कबड्डी, खो खो, आट्यापाट्या विठू दांडू या खेळांकडे दुलर्क्ष करू लागले आहेत. विशेष करून पालकांनी मुलांना या खेळांची सवय लावुन दिली पाहिजे. या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात१) साहील जितेंद्र तोडकर २) गणेश पियुष शिंदे ३) करण शैलेश वाबळे, ४) प्रेम रोहीदास भुमकर, ५) वेदांत गुरू वाबळे ६) मोहम्मद ईसा मजाहर शेख
१४ वर्षे वयोगटातील मुली.१)समिक्षा वसंत बोर्डे २) मानसी संतोष ताजे ३)अनुष्का ब्रद्रिनाथ देठे ४) प्रतिक्षा संतोष वाघोले ५) आर्या प्रविण वाघोले ६) काव्यांजली सचिन भोर
१७ वर्षे वयोगटात मुले १) सुरज अर्जुन भले २) आर्यन प्रशांत कानडे ३) मोहीत अजय ठवळे ४) स्वराज्य संजय यादव ५) कार्तिक दत्तात्रय गंभीर ६) अर्थव राजेंद्र कवड
१७ वर्षं वयोगटात मुली.१)धनश्री राहुल खांडगे २) समिक्षा अशोक गटकळ ३)वेदिका युवराज शिंदे ४)आयेशा परवेज शेख ५)सायली नितीन बेनके ६) अक्षदा रामेश्वर जाधव
१९ वर्षे वयोगटातील मुले१) अभिजित गणेश बुळे २) ब्रम्हनाथ गुलाब जाधव ३) प्रज्वल प्रभाकर पोगरखर ४) आर्यन युवराज शिंदे ५) प्रथमेश प्रशांत मांडे ६)ओंकार बाळासाहेब शेळके १९ वर्षे वयोगटातील मुली.१)तन्वी निलेश शिंदे२)अंजली अजय कानडे ३) ज्ञानेश्वरी संतोष वोघोले ४)साक्षी कैलास सोलाट ५) सृष्टी विक्रम वायाळ ६)साक्षी किरण ठाकर या विद्यार्थ्यांचे नंबर आले आहेत. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ६७६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेसाठी राजुरी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य जी. के.औटी पर्यवेक्षक सुनिल पवार, किरण औटी,मंगेश डुंबरे, प्रकाश जोंधळे,अशोक राहींज सर किशोर कडलाक इयत्ता दहावीचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले तसेच पंच म्हणून जुन्नर तालुका शिक्षक क्रीडा संघटनेचे सदस्यांनी काम पाहिले.