जूनियर नॅशनल बेसबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये डॉ.कदम गुरुकुलच्या व्यंकटेश शेटेची निवड

1 min read

इंदापूर दि.१९:- 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 रोजी नरसिमा कॉलेज अमरावती या ठिकाणी झालेल्या 18 व्या जुनियर राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाकडून खेळणारा डॉ. कदम गुरुकुल इंदापूरचा व्यंकटेश जयवंत शेटे याची सांगरूर (पंजाब) या ठिकाणी होणाऱ्या 32 व्या ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघामध्ये निवड झाली.

सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाने अहमदनगर जिल्हा संघाचा 3/0 ने पराभव केला. पुढील सामन्यांमध्ये नाशिक जिल्हा संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सदरील संघाबरोबर त्याने नेत्रदीपक खेळ करून 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये होणाऱ्या 32 व्या ज्युनियर नॅशनल बेसबॉल चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघामध्ये त्याची निवड झाली.

व्यंकटेश आणि प्रशिक्षक सोमनाथ नलवडे यांचे डॉ. कदम गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम सर शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, सचिव नंदकुमार यादव, स्कूल मॅनेजर संदीप जगताप, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे