समर्थ च्या १३ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

1 min read

बेल्हे दि.१८:- पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व व्हिजन इंटरनॅशनल स्कूल डुंबरवाडी ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेमधून समर्थ च्या एकूण १३ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाल्याची माहिती ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर व गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे: १४ वर्षे मुले: हार्डल्स- प्रथम क्रमांक-साई दिघे, उंच उडी- तृतीय क्रमांक -श्रेयस म्हस्के

४०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक-कार्तिक पुंडे, १७ वर्षे मुले:१०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक-गौरव मटाले, हर्डल्स- प्रथम क्रमांक-आर्यन भांबेरे,१७ वर्ष मुली:४ x १०० रीले-प्रथम क्रमांक-साक्षी आहेर,संस्कृती देशमाने, सानिका मेहेर,चैत्राली गुंजाळ. हर्डल्स- प्रथम क्रमांक-साक्षी आहेर, तृतीय क्रमांक-समृद्धी शेळके,१९ वर्षे मुले:तिहेरी उडी- प्रथम क्रमांक-रोहन सुडके. थाळीफेक-प्रथम क्रमांक-स्वप्निल चासकर, २०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक-फैयाज शेख,तृतीय क्रमांक-वरद डुकरे, उंच उडी-द्वितीय क्रमांक-प्रवीण गगे, तिहेरी उडी-द्वितीय क्रमांक-सिद्धेश बांगर, गोळा फेक-तृतीय क्रमांक-स्वप्निल चासकर, ४ x १०० रिले-द्वितीय क्रमांक-वैष्णवी गायके, मयुरी झावरे,प्रीती अडसरे,ईश्वरी दाते.

या खेळाडूंना क्रीडा संचालक एच पी नरसुडे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,सुरेश काकडे,कीर्ती थोरात,ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहल शेळके. जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे