समर्थ संकुलात जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १८७ संघांचा सहभाग
1 min readबेल्हे दि.१५:- पुणे जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ जुनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा समर्थ क्रीडा संकुलात संपन्न झाल्याची माहिती जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध वक्ते व कीर्तनकार निलेश महाराज कोरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहल शेळके, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तबाजी वागदरे, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, सचिव संजय खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण १८७ मुले-मुलीच्या संघाने सहभाग घेतला होता. विजेते संघ खालील प्रमाणे:
१४ वर्षे मुली:-
प्रथम क्रमांक:-रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद, द्वितीय क्रमांक:- पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा, तृतीय क्रमांक:- शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर.
१७ वर्ष मुली:-
प्रथम क्रमांक:-ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी, द्वितीय क्रमांक:-संत गाडगे महाराज विद्यालय पिंपळगाव जोगा,तृतीय क्रमांक:-चैतन्य विद्यालय ओतूर.
१९ वर्ष मुली:-
प्रथम क्रमांक:-अण्णासाहेब वाघिरे कॉलेज ओतूर
द्वितीय क्रमांक:-श्री शिवछत्रपती ज्युनिअर कॉलेज जुन्नर, तृतीय क्रमांक:-रा प सबनीस ज्युनिअर कॉलेज नारायणगाव.
१४ वर्षे मुले:-
प्रथम क्रमांक:- चैतन्य विद्यालय ओतूर, द्वितीय क्रमांक:-मॉडर्न स्कूल बेल्हे, तृतीय क्रमांक:-महात्मा गांधी हायस्कूल पारगाव.
१७ वर्ष मुले:-
प्रथम क्रमांक:- कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे(बु )
द्वितीय क्रमांक:-रा प सबनीस विद्यामंदिर नारायणगाव,
तृतीय क्रमांक:-ज्ञानमंदिर हायस्कूल आळे.
१९ वर्ष मुले:-
प्रथम क्रमांक:-रा प सबनीस ज्युनिअर कॉलेज नारायणगाव, द्वितीय क्रमांक:-ज्ञानमंदिर जुनिअर कॉलेज आळे, तृतीय क्रमांक:-श्री शिवछत्रपती कॉलेज जुन्नर.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक एच पी नरसुडे, क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, सुरेश काकडे, कीर्ती थोरात, ज्ञानेश्वर जाधव, प्रा.संतोष पोटे, प्रा.संगीता रिठे, प्रा.सुरेखा पटाडे, प्रा.वैशाली औटी. प्रा.प्रतिमा औटी, प्रा.नेहा बुगदे, प्रा.नूतन पोखरकर, प्रा.सायली नवले प्रा.स्वाती खोडदे, प्रा.सोनल कोरडे, प्रा.राजेंद्र नवले, प्रा.विनोद चौधरी, प्रा.अमोल खामकर, प्रा.राहुल वाळुंज यांनी विशेष परिश्रम घेतले.