जुन्नर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत मॉडर्न च्या विद्यार्थांनी पटकावला द्वितीय क्रमांक
1 min read
बेल्हे दि.१३:- जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ गुरुकुल बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुका कबड्डी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी १४ वर्षे खालील वयोगटातील मुलांच्या संघाने उत्तम कामगिरी बजावली व संघ उपविजेता झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक योगेश शिंदे व विशाल गुजर यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग व पालक वर्गाने अभिनंदन केले.