अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिके भुईसपाट हजेरी

1 min read

अहिल्यानगर दि.३:- जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. बुधवारी (ता.२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, संत्रा- मोसंबी या फळबागांचेही नुकसान झाले.

जिल्ह्याच्या उत्तरेतील संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि अहिल्यानगर तालुक्यातील काही गावात सहा वाजल्यापासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. फळबागांमध्ये आंबा, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले. आंब्याला सध्या कैऱ्या आल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे त्यांची पडझड झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

मंडळनिहाय पावसाची आकडेवारी (मिलीमीटर)
– चिचोंडी- ६.८, – कापूरवाडी- १.५, – रुच्छ्त्तीशी ५.३, – टाकळी – २८. ३,- कान्हूर पठार -२८.३, – वडझिरे ३, – कर्जत -१२.५, – मिरजगाव-४४, – माही -१८, – संगमनेर -३, – धांदरफळ- ७, – अकोले ४, – वीरगाव १०. ८, मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे