शेअर बाजारातील धास्तीने सोने वाढले; ७ दिवसांत सोन्याच्या भावात ३५०० नी वाढ

1 min read

अहिल्यानगर दि.३:- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे शेअर बाजारात प्रचंड पडझड सुरु आहे. अशातच सोन्याच्या दरात चढउतार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी (2 एप्रिल) सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव ९३,६५० रुपये इतका होता. काल सोन्याचा भाव 93 हजार 700 रुपये इतका होता. सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. मात्र, शेअर बाजारातील अस्थिरता पाहता सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात करासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या ७ दिवसांमध्ये सोन्याचा भाव ३५०० हजारांनी वाढला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे