जाधववाडीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण; ४० शेतकऱ्यांचा सहभाग

1 min read

बेल्हे दि.३१:- जाधववाडी (ता.जुन्नर) येथे शास्त्रशुद्ध कांदा काढणी आणि साठवणूक या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन जागतिक संशोधन संस्था व बायफ संस्था पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमात बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी गणेश शेवाळे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बिजप्रक्रिया, रोपवाटीका, कांदा लागवड, किड रोग व्यवस्थापन, शासकिय योजना, कांदा पिकापासून विविध मुल्यवर्धित उत्पादने जसे कि कांदापेस्ट, कांदा पावडर, कांदा रिंग्स, कांदा लोणचे, कांदा रस, कांदा तेल या प्रक्रिया उद्योग तसेच इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.जाधववाडी येथिल कृषी मित्र उत्तम जाधव यांनी कांदा पिकास पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकी पूर्वी घ्यावयाची काळजी, कांद्याचे जीवणातील महत्व, कांदा, साठवणुकीतील नुकसान कसे कमी करता येतील. इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी किसन जाधव होते तर सूत्रसंचालन वसंत गंधट यांनी केले व आभार गावचे सरपंच अजित जाधव यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!