कोरोना रुग्णांची संख्या २७०० च्या वर, 7 जणांचा मृत्यु
1 min read
नवी दिल्ली दि.३१:- देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे.या आधीच्या आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.आंध्र प्रदेशात १६, अरुणाचल प्रदेशात ३, आसाममध्ये २, चंदीगडमध्ये १, छत्तीसगडमध्ये ३, दिल्लीत २९४, गोव्यात ७, गुजरातमध्ये २२३, हरियाणामध्ये २०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ४, कर्नाटकात १४८, केरळमध्ये ११४७, मध्य प्रदेशात १०,
महाराष्ट्रात ४२४, मिझोराममध्ये २, ओडिशामध्ये ५, पुद्दुचेरीमध्ये ३५, पंजाबमध्ये ४, राजस्थानमध्ये ५१, तामिळनाडूमध्ये १४८, तेलंगणात ३, उत्तराखंडमध्ये २, उत्तर प्रदेशात ४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतही एका महिलेचा मृत्यू झाला आहे.