राजुरीत दिव्यांग कल्याण निधीचे वाटप
1 min read
राजुरी दि.३१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील एकुण 116 दिव्यांग लाभार्थ्यांना सन 2025 – 2026 च्या 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीतुन 3 लाख 64 हजार 983 निर्वाह भत्त्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी दिव्यांगाच्या असणा∙या समस्या पदाधिकारी यांनी समजुन घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले. दिव्यागाच्या योजेनेबाबत ग्रामविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांगाच्या जास्तीत जास्त योजना राबवुन त्याचा लाभ दिव्यांग बांधवाना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत गावाच्या सरपंच प्रिया हाडवळे यांनी व्यक्त केले.
दिव्यांगाच्या वतीने अयुब पठाण यांनी मत व्यक्त केले. यावेळी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे , उपसरपंच माऊली शेळके, माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ शिंदे, एम. डी घंगाळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर , रंगनाथ औटी,
शाकिर चौगुले, गौरव घंगाळे, मिना आवटे, शितल हाडवळे, सुप्रिया औटी, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, रुपाली औटी, ढोरे भाऊसाहेब, नितीन औटी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.