अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार

1 min read

अहिल्यानगर दि.१:- मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘तुकाई’ उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुकाई योजनेला चालना मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत कर्जत परिसरातील २४ पाझर तलाव भरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. एकूण १९ गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे