पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्काबारावर पोलिसांचा छापा

1 min read

अहिल्यानगर दि.५:- कल्याण रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्काबारावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी छापा टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आली.

राज घनश्याम खाटिक (रा. अहिल्यानगर), अभिषेक सुरेश खाटिक (रा. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रस्त्यावरील एका हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास सूचना देऊन पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे