साकुर पठारावरील नेटवर्क समस्येबाबत केंद्रीय दुरसंचारमंत्र्यांना निवेदन

1 min read

अहिल्यानगर दि. ५:- कुंभारवाडी (वरवंडी), जोंधळवाडी (दरेवाडी), तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गावातील सरकारी कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने, रेशनकार्ड- स्वस्त धान्य वितरण प्रणाली, वैद्यकीय, सरकारी योजना, शैक्षणिक योजना, ई-पिक पाहणी आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांचे काम सोपे होईल.महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील १) कुंभारवाडी (वरवंडी), २) जोंधळवाडी (दरेवाडी) अगदी डोंगराने वेढलेली हि लगतची गावे, सदर संपुर्ण गाव व परिसरात मोबाईल नेटवर्क संदर्भातील अडचणींची दखल आपल्या पातळीवर घेण्यात येऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येऊन. मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे अशी संपूर्ण परिसरातील नागरीकांचे वतीने विनंती केली आहे.यापूर्वी सन २०२१ मध्ये तत्कालीन दूरसंचार मंत्री सन्माननीय अश्विनीजी वैष्णव साहेब यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातीलच खरशिंदे,चौधरवाडी, नांदूर खंदरमाळ आणि वरवंडी गावचा काही भाग नेटवर्क कव्हरेज मध्ये आलेला आहे.शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी या निवेदनासोबत यापूर्वी केलेला पत्रव्यवहार, केंद्र शासन स्तरावर दाखल तक्रारींचे तपशील, तसेच संबंधित गावकऱ्यांची यादी आणि त्यांचा संपर्क न होणारा मोबाईल नंबर ची यादी केंद्रीय दुरसंचारमंत्री ज्योतीरादित्यजी सिंधीया यांच्या बरोबरच द्रौपदिजी मुर्म, राष्ट्रपती, भारत सरकार नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार डॉ.पेम्मासनी चंद्रशेखर, राज्यमंत्री, दूरसंचार मंत्रालय, भारत सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनादेखील संबंधित निवेदन देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे