आळे दूध संस्थेच्या चेअरमन पदी उल्हास सहाने यांची निवड
1 min read
आळे दि.३:- आळे दुग्ध विकास संस्था, आळे (ता.जुन्नर) पंचवार्षिक निवडणुकीच्या संचालक मंडळापैकी चेअरमन निवडीची प्रक्रिया गुरुवार दि.३ रोजी पुणे या ठिकाणी पार पडली.
या निवडणुकीत दोन पॅनलचे संचालक एकत्र आले आणि उमेदवार उल्हास सहाणे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे व शांताराम डावखर यांनी अर्ज भरला मात्र ऐनवेळी ज्ञानेश्वर कुराडे यांनी माघार घेतली व उल्हास सहाणे व शांताराम डावखर या दोन उमेदवारांना मतदान झाले.
16 पैकी 15 संचालक उपस्थित होते. पैकी उल्हास सहाने यांना 8 मते व शांताराम डावखर यांना 6 मते पडली व एक मतदान बाद झाले. अशाप्रकारे आळे, संतवाडी,कोळवाडी या गावातील निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील मोठी दूध संस्था आणि या निकालातून गाव एका वेगळ्या विचाराकडे जात असल्याचा संदेश संपूर्ण तालुक्याला मिळालेला आहे.
यामध्ये नेताजी डोके व भाऊ कुऱ्हाडे यांची सरशी झाल्याची चर्चा गावात आहे.