राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृपाल पवार लिखित “मास्टरींग रिसर्च” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

1 min read

Oplus_131072

कर्जुले हर्या दि.३:- संशोधन क्षेत्रातील नवोदित आणि तज्ज्ञांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या “मास्टरींग रिसर्च: अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड फॉर बिगिनर्स अँड एक्सपर्ट्स” या पुस्तकाचे भव्य प्रकाशन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडले. या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन प्रा. संजय देशमुख आणि प्रा. संजय चौधरी, वरिष्ठ व्याख्याते, सरकारी पॉलिटेक्निक, नाशिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यासक उपस्थित होते. डॉ. कृपाल पवार यांनी या पुस्तकाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले की, हे पुस्तक संशोधन प्रक्रिया, पद्धती आणि संकल्पनांची सखोल माहिती देत असून, ते नवोदित संशोधकांसाठी तसेच अनुभवी संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी संशोधन आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगितेबद्दल आपले विचार मांडले. प्रा. संजय देशमुख यांनी सांगितले की, “संशोधन हे कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे आणि असे मार्गदर्शक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठरेल.” तसेच, प्रा. संजय चौधरी यांनी पुस्तकातील प्रगत संकल्पना आणि तंत्रांचा उल्लेख करत संशोधनाच्या आधुनिक ट्रेंड्सवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. कृपाल पवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि संशोधनासंदर्भात सतत नवीन माहिती घेण्याची आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. हा ग्रंथ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकासाठी एक अमूल्य संदर्भसंग्रह ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे