शिक्षणप्रेमी ग्रामस्थांमुळेच शिरोली न्यू इंग्लिश स्कूलची भरभराट:- शरद लेंडे.
1 min read
शिरोली दि.३१:- दर्जेदार शिक्षण व नाविन्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवू शकतात त्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थ शिक्षण प्रेमी
असावे लागतात तेव्हाच विद्यालयाची भरभराट होते असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी मांडले . पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे सुलतानपूर बोरी
तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाखेच्या नावांच्या चार नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक स्वरूपाच्या पाट्यांचे उद्घाटन या पाट्यांसाठी अर्थसहाय्य देणारे दानशूर उद्योजक व विशाल ट्रान्सपोर्ट चे सर्वेसर्वा अविनाश डावखर,
माजी राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते गुरुजी तसेच गुंजाळ दांपत्य शिवराम गुंजाळ गुणवंत शिक्षक, तसेच आदर्श शिक्षिका राधा गुंजाळ, शाळा व्यवस्थापनचे राजू पोळ,
शरद लेंडे व विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक एम. एम. बोऱ्हाडे या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पाडव्याच्या शुभमुहूर्तावर व वाद्यांच्या सुमधुर गजरात करण्यात आले. त्यावेळी सर्व परिसर आनंदाने व उत्साहाने भरून गेलेला होता.
संस्थेची शाखा गावात आहे परंतु शाखेचा बोर्ड गावात नाही, शिरोली निश्चित कोणती ? दोन्ही शिरोलीच्या शाळेची नावे सारखीच आहेत तेव्हा संभ्रम निर्माण व्हायचा.? आज घडीला एक नाही दोन नाही तर चार पाट्यांचे लोकार्पण होत असल्याने माझी गेल्या सहा महिन्यांची खंत दूर झाली असे प्रतिपादन व्याख्याते व साहित्यिक महेंद्र बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेलं कौशल्य हे कुठेही पाठीमागे नसतं हे संस्कृती अर्जुन खिलारी ने या ठिकाणी दाखवून दिले आहे. ही गुणी विद्यार्थी आज शाखेत व तालुक्यातील सर्व शाखांमध्ये इंग्रजी विषयात प्रथम आली असून, संस्थेत चतुर्थ क्रमांक पटकावून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
त्याबद्दल तिचा व मार्गदर्शक शिक्षक (मुख्याध्यापक) महेंद्र बोऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला. बोऱ्हाडे हे स्वयंभू, दिशादर्शक व अष्टपैलू नेतृत्व विद्यालयाला लाभले याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो असे गौरवउद्गार लेंडे यांनी काढले.
विद्यालयासाठी आर्थिक सहाय्य देऊन मदत करणाऱ्या चारही दानशूर व्यक्तिमत्त्वांचे सन्मान शरद लेंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यामध्ये विशाल ट्रान्सपोर्ट चे अविनाश डावखर, रामभाऊ सातपुते गुरुजी आदर्श मुख्याध्यापक, राधाबाई गुंजाळ आदर्श मुख्याध्यापिका, शिवराम गुंजाळ गुणवंत शिक्षक यांचा समावेश होता.
याप्रसंगी उपसरपंच दत्तात्रय डावखर, बाजीराव मुळे, संजय डावखर, अविनाश खिलारी, खंडू आप्पाजी खिलारी, ज्ञानदेव गणपत खिलारी, मा. सरपंच सावळेराम सुखदेव डावखर, जयसिंग गुंजाळ, बाळासाहेब खिलारी, अजित खिलारी, मयूर कसाळ, अमन मण्यार, गेनभाऊ डावखर, ह भ प तुकाराम डावखर तसेच
असंख्य पालक व ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दिवेकर,आरोही फ्लेक्स चे सर्व सदस्य वाव्हळ बंधू व सुरज बाजगे तसेच गणेश उर्फ सिताराम खिलारी या सर्वांचे विद्यालयाला सहकार्य लाभले,
मुख्याध्यापक बोऱ्हाडे व राजू पोळ यांनी वेळोवेळी दानशूर व्यक्तींचा सततचा पाठपुरावा केला आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम होऊ शकला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, व सूत्रसंचालन महेंद्र बोऱ्हाडे यांनी केले.