श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीतील ३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
1 min read
पिंपळगाव खडकी दि.४:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा (NMMS) सन २०२४-२५ मध्ये आंबेगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी चे घवघवीत यश, या विद्यालयातील ३९ विद्यार्थी पात्र झाले आहेत. एनएमएमएस शिष्यवृत्ती २०२४-२५ परीक्षेत इयत्ता ८ वीतील १२ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती पास झाले असून २४ विद्यार्थी याच एन.एम.एम.एस. अंतर्गत सारथी शिष्यवृत्तीधारक आहेत. एन.एम.एम.एस शिष्यावृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी बाराहजार (१२००० /-) रुपये प्रमाणे ४ वर्ष एकूण ४८०००/- रुपये व
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती २४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९६००/- रुपये प्रमाणे ४ वर्ष एकूण ३८४००/- शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक फापाळे डी.पी. यांनी दिली. विभागप्रमुख कु.खुडे व्ही.एम. व शिक्षक लायगुडे व्ही.के., सासवडे एन.एस.,
पोखरकर जे.एल.यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य,सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सेवक वृंद यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
त्याच बरोबर पिंपळगाव (ख) येथील आरंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू देऊन गुणगौरव संभारंभ घेण्यात आला. NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे कुरकुटे सानवी भरत (132), गावडे ईश्वरी सुशील (126), पोखरकर ऋतुजा अशोक (117), इंदोरे स्मृती पंडीत (116),
पोखरकर दुर्वा विनोद (112), पोखरकर स्वरा तुळशीराम (112), पोखरकर धनश्री सुनिल (110), बांगर आर्या विकास (109), बांगर स्वरा दत्तात्रय (108), बांगर स्वरा गणेश (103), अरगडे सिद्धी ठकसेन (102),ढवळे मयुरेश वनराज (86) हे बारा विध्यार्थी केंद्र सरकार शिष्यवृत्ती धारक ठरले. बाकीचे २४ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.