तालुकास्तरीय उमंग प्रश्नमंजुषा स्पर्धेत भोसलेवाडी शाळेचा तृतीय क्रमांक

1 min read

आणे दि.५:- द हंस फाऊंडेशन व पंचायत समिती जुन्नर आयोजित उमंग प्रश्नमंजुषा 2024-25 स्पर्धेत आणे पठार भागावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील विविध फेऱ्या पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच शिवजयंती महोत्सव 2025 अंतर्गत तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात या शाळेने प्रावीण्य दाखविले आहे. स्पर्धेकरिता शिक्षक वर्षा गोपाळे, महेश साबळे, केंद्रप्रमुख सविता कुऱ्हाडे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी भोसले, तसेच झांबर भोसले, विठ्ठल बेलकर, संभाजी बेलकर, संदिप भोसले व ग्रामपंचायत पेमदरा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे