जो पर्यंत स्री घडत नाही, तो पर्यंत हा देश सुसाक्षर होणार नाहीः प्रा. शुभांगी शिंंदे

1 min read

बेल्हे दि.२७:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात भव्य माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी फलटण येथील सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. शुभांगी शिंदे यांचे ‘मुलांच्या जडणघडणीत माता पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान झाले. बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रा. शुभांगी शिंदे आपल्या व्याख्यानात म्हणाल्या, “ग्रामीण भागातील स्री कणखर असते. सैन्यदलासारख्या जोखमीच्या क्षेत्रातील आपल्या मुलांबद्दल देखील आईला स्री म्हणून अभिमान असतो. स्रीत्वाचे अस्तित्व शोधणे म्हणजे केवळ आधुनिक जीवनशैली व चंगळवादाचा स्वीकार नव्हे. तर योग्य व्यायाम आहाराने व्यक्तिमत्व घडवणे होय” मुलांचे मोबाईल व्यसन कमी करण्यासाठी माता पालकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य तथा प्राचार्य अजीत अभंग, पालक शिक्षक संघाच्या सदस्य सुनिता चोरे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा कविता डुकरे, गुंजाळवाडी गावच्या उपसरपंच संगिता बोरचटे, ज्येष्ठ माता पालक सुशीला गटकळ, ग्रामपंचायत सदस्या कमल घोडे, दीपाली मटाले, पल्लवी भंडारी, मंदाकिनी नायकोडी माता पालक संघाच्या सदस्या रेश्मा बनकर, उज्जवला काळे, शारमीन शेख, पालक शिक्षक संघाच्या सदस्या सुनिता सोनवणे, चित्रा कोकणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुषमा भुजबळ, कांचन वाघ, लक्ष्मी पिंगट आदर्श ग्रामसेविका मिनाक्षी गुंजाळ व बहुसंख्य माता पालक उपस्थित होत्या.माता पालक मेळावा सभा कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका स्मिता बांगर यांनी केले. सूत्रसंचालन माता पालक संघाच्या सहसचिव अश्विनी गेंगजे यांनी तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख कोमल कोल्हे यांंनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे