मोहित ढमाले युवा मंचाच्या वतीने ओतूर येथे महाआरोग्य शिबिर

1 min read

ओतूर दि.२७:- संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी च्या वतीने आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहातील शेवटच्या महाआरोग्य शिबिराचे नियोजन मोहितदादा ढमाले युवा मंच यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय ओतूर येथे गुरुवार दि.२६ रोजी करण्यात आले होते.

त्याचे उद्घाटन तालुक्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे व शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी फित कापून केले. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, देविदास तांबे, प्रशांत डुंबरे, गोविंद तांबे, जयवंत डुंबरे,

जालिंदर पानसरे, शिरीष डुंबरे , मनोज घोंगडे, प्रमोद ढमाले , डॉक्टर सारोक्ते , सिताराम ढमाले , निलेश तांबे, जयराम तांबे , जितुभाऊ बिडवई, आत्तार सर, भाऊसाहेब इसकांडे व सरपंच उपसरपंच , ग्रामस्थ उपस्थित होते. ओतूर पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे