शुभम तारांगण गृह प्रकल्पात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
1 min read
आळेफाटा दि.२६:- जुन्नर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO) सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते शुभम तारांगण प्रकल्पात जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा पाणी पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी तारांगण सोसायटीचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सचिव दिनेश आग्रे, खजिनदार प्रदीप शिंगोटे तसेच ग्रामपंचायत आळे व वडगाव आनंदचे पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
बिडीओ सचिन सूर्यवंशी यांनी प्रकल्पची पाहणी करताना सोसायटी मध्ये असलेले WTP (जल शुद्धीकरण प्रकल्प), STP (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प), OWC (कंपोस्ट खत प्रकल्प), PV solar, सोलर वॉटर हिटर इत्यादी प्रकल्पांची पाहणी केली.
या भागामध्ये शिर्डी देवस्थान नंतर शुभम तारांगण प्रकल्पत आत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाहून प्रशंसा केली तसेच जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.