जिओ च्या नेटवर्क सेवेमुळे नळवणेकर त्रस्त
1 min read
नळवणे दि.२६:- जुन्नर तालुक्यातील नळवणे या गावामध्ये फक्त जिओ या एकच मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीचा टॉवर असून दोन महिन्यापासून जिओ च्या सेवेमुळे नळवणे ग्रामस्थ वैतागले आहेत. जिओ या कंपनीने गेल्या दोन महिन्या पासून आपल्या रिचार्ज चे दर वाढवल्यामुळे आधीच ग्राहक वर्ग वैतागलेला असताना. त्यात भर म्हणूनच की काय नळवणे गावामध्ये जिओ ची नेटवर्क सेवा बऱ्याच वेळा बंद असते. या विषयी गावातील ग्रामनेते बाबाजी शिंदे यांनी चौकशी केली असता टॉवर कडे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याचे कारन् सांगण्यात येत आहे. परंतु याचा मनस्ताप जिओ च्या ग्राहकांना सोसावा लागत आहे.
दुसऱ्या कोणत्याही मोबाईल ची या गावात नेटवर्क सेवा नसल्याने ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बीएसएनएल या कंपनीने शक्य झाल्यास नळवणे गावामध्ये टॉवर उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.