डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहित ढमाले युवा मंचाचा १००० ज्येष्ठांना काठीचा आधार
1 min read
ओतूर दि.२६:- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहित ढमाले युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी “एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी” या कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव सहानी, ता. जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आला. मोहित ढमाले युवा मंच आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील १००० ज्येष्ठांना आधार काठ्यांचे वाटप करणार असल्याचे यावेळी युवा मंचचे पदाधिकारी आणि ओतूरचे माजी उपसरपंच प्रेमानंद आस्वार यांनी सांगितले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व आधार काठी वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे नितीन ढमाले यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव एफ.बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुंबरे, मनोज घोंगडे, निलेश तांबे, योगेश गाढवे, संजय पानसरे,योगेश वाघचौरे,माजी सरपंच वैशाली तांबोळी, सारिका तांबोळी, दिपाली तांबोळी,
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार वाबळे,गणपत वाबळे, विशाल तांबोळी, मदन वाबळे, पंकज शिंदे, सुनील शिंदे, शैलेश वाबळे, दादाभाऊ तांबोळी, दिगंबर तांबोळी आदी मान्यवर, ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच खंडू शिंदे यांनी केले, तर आभार माजी सरपंच वैशाली तांबोळी यांनी मानले.