आळे येथे महात्मा फुले चौक लोकार्पण सोहळा संपन्न
1 min read
आळे दि.२४:- आळे (ता.जुन्नर) येथे कल्याण – नगर महामार्गावर महात्मा फुले चौक लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आळे येथील खंडोबा देवस्थान जवळ हा चौक असून या चौकाचे नामकरण करण्यात आले. तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे, माजी जि.प.सदस्य प्रसन्न डोके, माजी जि.प.सदस्य तुषार थोरात. माजी पं.स. सदस्य जिवन शिंदे, शिवनेर भूषण सुंदर कुऱ्हाडे, बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उदय पाटील भुजबळ यांनी प्रास्ताविक केले आणि चंद्रकांत डोके गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानिमित्त ह.भ.प.बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे, रवींद्र गुंजाळ, संजय खंडागळे, अरुण हुलवळे.
सुनील जाधव,निलेश भुजबळ,बाळशिराम कुऱ्हाडे, चारुदत्त साबळे,अनिल कुऱ्हाडे,गणेश शिंदे,भाऊ तितर, सुभाष वाघोले, सौरभ डोके, संजय जाधव, राजेंद्र दिवटे, मुकुंद भंडलकर, भालचंद्र भुजबळ, दिगंबर घोडेकर, सविता भुजबळ, मंगल तितर, ज्योती शिंदे, सोनाली वाघोले व अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थीत होते.