लंके प्रतिष्ठाणला १ कोटींचा फिरता दवाखाना

1 min read

पारनेर दि.२२:- सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांना आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी एक कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. शनिवारी शरद पवार यांनी शरदचंद्र पवार आरोग्य रथाचे बारामती येथे लोकार्पण केले.देशामध्ये कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला. त्यांचे हे काम पाहून त्यावेळीही शरद पवार यांनी नीलेश लंके यांना एक अद्ययावत रुग्णवाहिका भेट दिली होती. खा. लंके यांनी कोरोना काळात केलेले काम जगभरात गाजले. कोरोना संकटानंतरही खा.लंके यांचे आरोग्याच्या बाबतीत काम सुरूच असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही त्यांनी हजारो रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे.पारनेर नगर मतदारसंघात मोठया प्रमाणावर आदिवासी भाग असून. या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. एखाद्या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही भीती असते. त्यामुळे एका फिरत्या दवाखान्याची उपलब्धता असावी, अशी खा. लंके यांची मागणी होती. खा. लंके यांची ही मागणी शरद पवार यांनी उचलून धरीत नीलेश लंके प्रतिष्ठाणसाठी अद्ययावत फिरता दवाखाना भेट दिला.या वेळी आ.अशोक पवार, सक्षणा सलगर, सुदाम पवार, विक्रम राठोड, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, प्रा. संजय लाकुडझोडे, डॉ. बाळासाहेब कावरे यांच्यासह खा. नीलेश लंके यांचे सहकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे