‘व्ही.जे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांना इंटरॅक्टिव्ह पॅनल व वॉटर कुलर; स्मार्ट शिक्षण व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

1 min read

वडगाव-कांदळी दि.७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथे एक भव्य आणि गौरवशाली सोहळा पार पडला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि त्यांच्या आरोग्यासाठी वॉटर कुलर या दोन महत्त्वपूर्ण सुविधांचे उद्घाटन या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन- स्वर्गीय नंदकुमार वाजगे फाउंडेशन नारायणगाव यांच्या अध्यक्षा हेमलता थोरात तसेच विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मुंबईचे अध्यक्ष आणि स्वर्गीय नंदकुमार वाजगे फाउंडेशन नारायणगावचे सेक्रेटरी अरुण पारखे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी विशाल जुन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सोनवणे हेही मान्यवर उपस्थित होते. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांचीही उद्घाटनासाठी उपस्थिती लाभली. त्यांच्या समवेत विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्मा विश्वस्त विक्रांत काळे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमामागे विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष अरुण पारखे यांचे विशेष प्रयत्न असून, त्यांच्या सहकार्यामुळे या सुविधा- स्वर्गीय नंदकुमार वाजगे फाउंडेशन नारायणगाव यांच्या माध्यमातून शाळेला मिळवून दिल्या गेल्या आहेत.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व वॉटर कुलर आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या उद्घाटनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे अरुण पारखे तसेच कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छाही दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत,त्यांच्या सहकार्य व पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मनिषा हांडे यांनी पार पाडले. या कार्यक्रमात शाळेच्या समन्वयिका सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी इंटरॅक्टिव्ह पॅनलचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. विद्यार्थ्यांनीही आपल्या आनंदमयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या,जेणेकरून तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांच्यासाठी अधिक आकर्षक आणि उपयोगी ठरेल. “आपण केवळ साधने जोडत नाही,तर आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहोत? असा संदेश देणारे विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूलचे हे कार्य निश्चितच स्त्युत्य आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे