महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिराचे नेत्रदिपक यश
1 min read
बेल्हे दि.१७:- महात्मा गांधी यांच्या विचारांचा शालेय विद्यार्थ्यांना परिचय व्हावा व विद्यार्थ्यांची मने सुसंस्कारित व्हावीत या उद्देशाने गांधी रिसर्च फौंडेशन, जळगाव यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत विद्यार्थ्यांनी एकूण पाच सुवर्ण पदक, कांस्य पदक व रजत पदकांची कमाई केली. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली. तन्वी गोरक्ष गुंजाळ, श्रावणी अमित मटाले, श्रावणी दत्तात्रय गुंजाळ या विद्यार्थीनींनी सुवर्ण पदक मिळवले तर सृष्टी प्रभाकर बांगर हीने कांस्य पदक मिळवले. सोहम विकास कवडे या विद्यार्थ्यास रजत पदक प्राप्त झाले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेबद्दल विद्यालयास गांधी रिसर्च फौंडेशनतर्फे आकर्षक ट्रॉफी प्राप्त झाली. विभाग प्रमुख बाळासाहेब गावडे यांनी ही ट्रॉफी प्राचार्य राजेंद्र पडवळ यांच्याकडे सुपूर्द केली.पदक प्राप्त विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक प्रविण राशीनकर, पर्यवेक्षक दत्तात्रय खोरे,
अनिवासी रयत गुरुकुल प्रमुख सुभाष बांगर, सहायक विभाग प्रमुख अश्विनी गेंगजे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.