‘रयत प्रज्ञा शोध’ परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे ३६ विद्यार्थी प्रविष्ट
1 min read
पिंपळगाव दि.१०:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत घेण्यात आलेल्या ‘रयत प्रज्ञा शोध’ परीक्षेला श्रीराम विद्यालय पिंपळगाव – खडकी चे एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातून ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पाच विद्यार्थ्यांची ” लक्ष्मीबाई भाऊराव पाटील” शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी.फापाळे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की संपूर्ण रयत शिक्षण संस्थेतून १६७ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. रयत प्रज्ञा शोध परीक्षेच्या ‘सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थी पुढीलप्रमाणे शौर्य उत्तम बांगर, पार्थव नितीन मुंढे, वेदांत राजेंद्र पोखरकर, वेदिका बाळासाहेब पोखरकर,
त्रिवेणी कृष्णाजी पोखरकर. या विद्यार्थ्यांना आर. टी. एस.विभागप्रमुख नीता आवटे, शिक्षक निलेश बाणखेले, अविनाश वाडेकर, विजया लायगुडे, सुमती राजगुरू, अर्चना आचार्य, नितीन सासवडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.