बेल्हेश्वर हरिपाठ मंडळाकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान
1 min read
बेल्हे दि.९:- बेल्हेश्वर हरिपाठ बेल्हे यांजकडून सुंदर हरिपाठ पठण व लेखन स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांचा,मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय यादीमध्ये क्रमांक मिळवल्या विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुंदर हरिपाठ लेखन व पठण स्पर्धेमध्ये देवांश फटके, आरोही कस्तुरे, रिया राजभर, श्रेया गाढवे, यश हिरवे , काव्या भालेराव , स्वराली कोकाटे, सेजल मटाले,रिया चव्हाण, तन्वी जाधव, देवांश पिंगट, जान्हवी चव्हाण यांना ह.भ.प विशाल महाराज हाडवळे, विवेक गंगाराम संभेराव, गोरक्षनाथ वाघ,
विलास पिंगट इत्यादी मान्यवरांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.गेले सहा महिन्यापासून हरिपाठ लेखन व पठनाचा हा उपक्रम बेल्हे गावांमध्ये सुरू होता. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी घेत हरिपाठ लेखन व पठण चांगल्या प्रकारे केले.
याचबरोबर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी आलिया सय्यद, स्वराली कोकणे, नित्या भालेराव, ऋत्वी बांगर , यशश्री बनकर , हर्षदा कामडी या विद्यार्थिनींनी मंथन परीक्षेमध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी स्थान पटकावल्याबद्दल यांचा सन्मान तसेच मार्गदर्शक शिक्षिका योगिता जाधव यांचा सन्मान यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य प्रीतम मुंजाळ व उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आला.
समाजामध्ये आदर्शवत काम करत असल्याबद्दल आदर्श ग्रामपंचायत सदस्या पुरस्कार पल्लवी स्वप्निल भंडारी, आदर्श उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्कार शिवाजी फड ,उत्कृष्ट आशा वर्कर पुरस्कार जमिला पठाण, वृद्ध माता पिता सेवेबद्दल उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार किसन देशमुख, विशेष प्रोत्साहन पुरस्कार दंतचिकित्सक डॉ. कुंडलिक आव्हाड ,आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिरा बेलकर इत्यादी मान्यवरांना बेल्हेश्वर
आशीर्वाद मंडळाचे संयोजक नारायण पवार, स्वाती संभेराव, स्वप्निल भाऊ भंडारी, संकल्प विश्वासराव विशाल महाराज हाडवळे, इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. विशाल महाराज हाडवळे, पल्लवी भंडारी यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.
विवेक गंगाराम संभेराव, शुभांगी वसंत भालेराव, राम फटके इत्यादी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल बेल्हेश्वर हरिपाठ मंडळाचे संयोजक नारायण पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी सुनील चौरे, मनिषा गोसावी, ज्ञानेश्वर गटकळ कॉन्ट्रॅक्टर इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संतोष डुकरे यांनी केले व आभार हरिदास घोडे यांनी मानले.