रामनवमीच्या दिवशी रामेश्वरम पंबन येथील देशातील पहिल्या ‘व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; 535 कोटी खर्च

1 min read

रामेश्वर दि.७:- रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या रामेश्वरममधील पंबन येथील ‘व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज’चे उद्घाटन केले आहे. 2019 साली मोदी यांनीच या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले होते.हा पूल देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. विशेष म्हणजे हा पूल उभारताना अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. यासाठी एकूण 535 कोटी रुपयांचा खर्चआला आहे. हा पूल म्हणजे भारताच्या समृद्ध अभियांत्रिकीचा उत्तम नमूना असल्याचे म्हटले जात आहे. पंबन येथे उभारण्यात आलेला हा पूल आशिया खंडातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. हा पूल मंडपमपासून रामेश्वरमपर्यंत उभारण्यात आला आहे. पूल उभारण्यासाठी एकूण 535 कोटी रुपयांचा खर्च आला. रविवार (5 एप्रिल) नरेंद्र मोदी यांनी या पुलाचे उद्घाटन केले आहे. सोबतच त्यांनी या भागातील वेगवेगळ्या 8300 कोटी रुपयांच्या विकासकामांचेही उद्घाटन केले आहे.हा पूल एकूण तीन टप्यांत काम करेल. पहिल्या टप्प्यात या पुलाचा सेंटर स्पॅन व्हर्टिकला उचलला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुना पूल टिल्ट होऊन वर उचलला जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पुलाखालून जहाज निघेल. अशा तीन टप्प्यांत हा पूल काम करेल. एखादे जहाज आल्यावर हा पूल वर उचलला जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे