पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले, विमानातून राम सेतूचे दर्शन
1 min read
नवी दिल्ली दि.७:- पंतप्रधान नरेंद्र मोदी था वयलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले आहेत.ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट केला आहे.हा व्हडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे, “नुकतेच श्रीलंकेतून परतताना मला राम सेतूच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले.
आणि एक दिव्य संयोग म्हणजे, ज्या दिवशी आयोध्येत ‘सूर्य तिलक’ होत होता, त्याच दिवशी हे घडले. या दोन्ही दर्शनाने मी धन्य झालो. प्रभु श्री राम हे आपल्या सर्वांना जोडणारी एक शक्ती आहे. त्यांच्या आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहो…”