अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका; संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

1 min read

मुंबई दि.७:- अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा दणका देत या प्रकरणात संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. मात्र आता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्य सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे. अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता. मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.मात्र याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार अशी भूमिका सरकारने घेतली होती. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या आदेशाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने आदेशावर स्थगितीची मागणी केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे