तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे
1 min read
धाराशिव दि.१०:- धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.
तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले.
दरम्यान तीन वर्षापासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केलाय. आतापर्यंत 35 आरोपी, मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार दुसरीकडे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे.
मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचं आव्हान असणार आहे. दरम्यान आता या ड्रग्ज तस्करी प्रकरण तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचा ही सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे, इथे अनेक पुजारी आहेत. त्यामुळे सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, अशी मागणी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केली आहे.तर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधकाऱ्यानी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली असल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आरोपी राणा पाटलांचे कार्यकर्ते, काँग्रेसचा आराेप तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघंही ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी आहेत. यांच्यासोबतचे खासदार निंबाळकर यांचे फोटो व्हायरल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारांवर निशाणा साधला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर इतर आरोपींचे फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय .ड्रग्स प्रकरणातील इतर काही आरोपी राणा जगजीतसिंह पाटील यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.