सराईत बॅटरी चोर कोतवाली पोलिसांनी घेतला ताब्यात
1 min read
अहिल्यानगर दि.१०:- शहरासह उपनगरात बॅटरी चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रेम जितेंद्र साठे (रा. केडगाव देवी नगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रेम साठे याने उपनगरातून बॅटरी चोरी केल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने केडगाव परिसरातून ताब्यात घेतला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस रोहिणी दरंदले, संदीप पितळे, विशाल दळवी, दीपक रोहोकले,तानाजी पवार, सूरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकाण, महेश पवार, सोमनाथ राऊत, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली.