बनावट एफडी, पॉलिसीच्या नावाखाली गंडा; 21 लाखांची फसवणूक; महिलेची तक्रार
1 min read
शिरूर, दि. १३:- शिरूर येथील एका गृहिणीला स्टेट बँकेच्या नावाने बनावट एफ. डी. आणि पॉलिसी देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी कल्पना अंकुश ढोरमले (वय ५०) रा. ओम रूद्र कॉलनी, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरूर शाखेत येऊन एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे काम पाहणाऱ्या विकास गुलाब बेलदार (रा. चहोली, पुणे) या इसमाने त्यांना बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज देणाऱ्या एफ.डी. व नवीन पॉलिसीचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांच्याकडून विकास बेलदार याने सहा ब्लॅक चेक घेतले आणि कोणतीही खरी पॉलिसी अथवा एफ.डी. सुरू न करता खोट्या पावत्या देत बनावट कागदपत्रांद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी चेक वटवून फिर्यादी यांच्या बँक खाती क्रमांकमधून त्याने स्वतः च्या खाती
क्रमांकमध्ये एकूण २१ लाख ४५ हजार रुपये जमा करून फसवणूक केली.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आला. सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात गुन्ह्याचा तपास सुरु आहे.