पोटात ७.८५ कोटींच्या कोकेनसह प्रवाशाला मुंबई विमानतळावर पकडले

1 min read

मुंबई दि.१५:- येथील- छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर यूगांडा देशाचा नागरिक असणाऱ्या एकाला ७८५ ग्रॅम कोकेन पोटात साठवून प्रवास करत असताना कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून पकडण्यात आले आहे. पकडलेल्या या ७८५ ग्रॅम कोकेनची बाजारभावाप्रमाणे किंमत ही तब्बल ७.८५ कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.यूगांडाच्या या प्रवाशाने प्रवासादरम्यान कोकेन पोटात लपवून आणले होते. विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्याआधारे त्याला ९ एप्रिलच्या रात्री तपासणीसाठी अधिकाऱ्यांकडून बाजूला घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात पिवळ्या गोळ्या गिळल्याचे कबूल केले. वैद्यकीय तपासणीत पोटातील गोळ्या ७८५ ग्रॅम वजनाच्या आढळल्या,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळ्यांमध्ये पांढरा पावडरसारखा पदार्थ होता जो कोकेन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे