बबन हाडवळे यांच्या कडून बांगरवाडी च्या मोरांना धान्य
1 min readबांगरवाडी दि.१६:- बांगरवाडी (ता.जुन्नर) गावात २५० ते ३०० मोर असल्याने दुष्काळाचे सावट पाहता या मोरांना खाद्य व पाण्याची टंचाई जाणवत होती. ही गरज ओळखून राजुरी ता.जुन्नर येथील बबन हाडवळे यांनी मोराला ५० किलो धान्ये उपलब्ध करून दिले. दरवर्षी ते मोरांसाठी धान्य देत असतात.
गेल्या वर्षी त्यांनी मोरांसाठी १०० किलो गहू व पाण्याचे ब्यालर पुरवले होते. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वन्य प्राण्यांना व मोरांचा चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
परंतु हे पानवठे व खाद्य दिवसेंदिवस कमी पडत असून मोरांना गहू, ज्वारी,बाजरी,तांदूळ व इतर धान्य दानशूर व्यक्तींनी द्यावे असे आवाहन पक्षी मित्र नारायण सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बांगर यांनी केले आहे.
