करंजी घाटात पेट्रोलचा टँकर पलटी; पेट्रोल पळविण्यासाठी तरुणांची गर्दी

1 min read

अहिल्यानगर दि.१६:- येथील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात मंगळवार (दि.१५) सकाळी साडेआठ वाजता मुंबईहून परभणीकडे वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ब्रेकफेल झाल्याने माणिक शहा पीर बाबा दर्ग्याजवळ धोकादायक वळणावर पलटी झाला. या अपघातामुळे एका कारचे देखील नुकसान झाले आहे.पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याची माहिती समजतात टँकरमधून पेट्रोल घेऊन जाणाऱ्या तरुणांची देखील मोठी गर्दी अपघातस्थळी झाली. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अहिल्यानगर व पाथर्डी येथून अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी बोलवण्यात आली होती. धोकादायक वळणावर टँकर पलटी झाल्याने करंजी घाटात सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामध्ये मकबल पठाण (रा. पिंपळगाव सय्यद मिया, जि. परभणी) हा टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे