कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर कार-ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; ३ जखमी

1 min read

ओतूर दि.२७:- अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील अहिनवे फाट्याजवळ ट्रक आणि कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.कारमधील सीताबाई आंबू साबळे (वय अंदाजे ६५ रा. निमगिरी ता. जुन्नर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दीपाली स्वप्निल शेळके, आशा नामदेव साबळे, स्वप्निल निवृत्ती शेळके या जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास कल्याणच्या दिशेने ट्रक येत होता. आळेफाट्याच्या दिशेने कार जात होती. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भयंकर होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. ट्रकचालक अनिल कदम (रा. श्रीरामपूर, जि. नगर) याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी ओतूर पोलीस टीम दाखल झाली.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!