जुन्नरमध्ये १२८ किलो गांजा पकडला;१७ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

जुन्नर दि.२७:- जुन्नर शहरालगतच्या गोळेगाव येथे एका चार चाकीमध्ये १२८ किलो वजनाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगलेल्या स्थितीमध्ये २ जण मिळून

आलेले असून त्यांना १७ लाख ८७ हजार मुद्देमालासह ताब्यात घेण्यात येवून विविध कलमानुसार जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.समीर दत्तात्रय शिंदे (वय ३५ रा. गोळेगाव) व शैलेश जगन्नाथ शिंदे (रा. आंबिवली, कल्याण) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. तर पोलीस शिपाई गणेश शिंदे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१२ लाख ८७ हजारा १०० रुपये किमतीचा गांजा तसेच पाच लाख रुपयांची (एमएच ०४ एफ ८४५९) ही कार असा एकूण १७ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे दोघेजण त्यांच्या कारमध्ये बेकायदा गांजाजवळ बाळगून विक्री करण्याच्या हेतूने आले होते.

यावेळी पोलीस पथकाने छापा मारून या चार चाकीतून १२८ किलो गांजा ताब्यात घेतला या दोघांविरोधात एनडीपीएस कायदा व बीएनएस कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उपनिरीक्षक अरविंद गटकुळ करीत आहेत. दरम्यान, जुन्नर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे जण गांजा विक्री मोठ्या प्रमाणात करीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे