दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे:- मोहन भागवत
1 min read
अहिल्यानगर दि.२७:- आम्ही आमच्या शेजाऱ्यांना त्रास देत नाही, पण प्रजेचे रक्षण करणे हे राजाचा कर्तव्य आहे. हिंसा हा आपला स्वभाव नाही. मात्र, दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे, असे राष्ट्र स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे.वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे प्रवर्तक स्वामी विज्ञानानंद यांच्या ‘द हिंदू मॅनिफेस्टो’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते शनिवार (दि.२६) बोलत होते. या समारंभात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना भावनिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मोहन भागवत म्हणाले, शेजारी वाईट कृत्ये करत असेल तर प्रजेचे रक्षण करणे राजाचे कर्तव्य आहे. जर कोणी वाईटाचा अवलंब केला तर राजाचे कर्तव्य आहे की तो आपल्या प्रजेचे रक्षण करणे आणि राजा हे करेल, असे त्यांनी सांगितले.