खरबूज, मोसंबी, डाळिंबाच्या भावात घसरण

1 min read

पुणे दि.२८:- गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी खरबूज, मोसंबी आणि डाळिंबाच्या भावात घसरण झाली. पपईच्या भावात वाढ झाली होती. तर इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.२७) फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्रा ३ ते ४ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज ३० ते ३५ टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस ६ ट्रक, पेरु १५० ते २०० क्रेट इतकी आवक झाली होती.फळांचे भाव पुढीलप्रमाणे -लिंबे (प्रतिगोणी): ३००-१६००, मोसंबी (३ डझन) : १६०-२८०, (४ डझन) : ८०-१८०, संत्रा : (१० किलो) : ६५०-१२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २५-१५०, आरक्ता : १०-४०, गणेश: ५-२०, कलिंगड : ८-१२, खरबूज : ५-१५, पपई ८-२०, चिक्कू (दहा किलो) : १००-५००. अननस (१ डझन): १००-६००, पेरू : (२० किलो) ३०० ते ४००

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे